प्रोजेक्टर
एक आऊटपुट डिव्हाइस आहे. ते संगणकादवारे किंवा ब्लू-प्लेयरदवारे तयार केलेल्या प्रतिमा
घेते आणि प्रोजेक्टर स्क्रीन, भिंत किंवा दुस-या पृष्ठभागावर प्रक्षेपण करते.
प्रोजेक्टर स्क्रीन, भिंत
किंवा दुस-या पृष्ठभाग हे आकाराने मोठे असतात जेनेकरुन हॉलमधील प्रत्येकजण ते पाहू
शकेल. तसेच स्क्रीन सफेद किंवा फिकट रंगाची असल्यास प्रतिमा स्पस्ट दिसते.
पहिला रोझल स्लाइड प्रोजेक्टर
हा 11 मे 1965 रोजी डेव्हिड हॅन्सेन नावाच्या व्यक्तीने पेटंट केला होता. आज आपण ओळखत
असलेले डिजीटल प्रोजेक्टर जीन डॉल्गॉफ यांनी 1984 मध्ये तयार केला होता.
प्रोजेक्टर कसा वापरला जातो?
प्रोजेक्टर किंवा प्रतिमा प्रोजेक्टर एक ऑप्टिकल डिव्हाइस आहेत. ते एखादया पृष्ठभागावर प्रतिमा प्रोजेक्शन करतात. हँडहेल्ड प्रोजेक्टर हे प्रतिमेच्या प्रोजेक्टसाठी लेसर किंवा एलइडीचा वापर करतात. प्रोजेक्टरला इनपुट कसे मिळते? प्रोजेक्टरसाठी एचडीएमआय केबल किंवा व्हीजीए केबल संगणकावरील इनपुट स्त्रोत म्हणून वापरतात.
अलिकडील सर्व आधुनिक टेलिव्हिजन आणि प्रोजेक्टरला एक किंवा अधिक पोर्ट असतात. जे त्यांना संगणकाव्दारे तयार केलेली प्रतिमा प्राप्त करण्यास आणि प्रदर्शित करण्यास अनुमती देतात. दोन्ही डेस्कटॉप आणि लॅपटॉप संगणक टीव्ही किंवा प्रोजेक्टरशी कनेक्ट करण्यास सक्षम आहेत.
प्रोजेक्टरचे प्रकार किती व कोणते आहेत?
प्रोजेक्शन तंत्रज्ञानाच्या जगात, प्रोजेक्टरचे चार मुख्य प्रकार आहेत. प्रत्येक प्रोजेक्टरचे वैशिष्टये. फायदे किंवा तोटे वेगळे आहेत.
प्रोजेक्टरचे प्रकार
१) डीएलपी (DLP-Digital Light Processing)
डीएलपी प्रोजेक्टरमध्ये सुक्ष्मदर्शी आरशांचा एक
ॲरे असतो तो प्रोजेक्टरमधील प्रकाश स्रोताकडे झुकतो किंवा त्यापासून दूर प्रक्षेपण
स्क्रीनवर प्रकाश किंवा गडद पिक्सेल तयार करतो. डीएलपी प्रोजेक्टर सिंगल चिप आणि थ्री
चिप प्रकारामध्ये उपलब्ध आहेत.
सिंगल चिप डीएलपी सर्वात चांगली प्रतिमा देतात.
साधारनपणे होम प्रोजेक्टरमध्ये सिंगल चिप वापरतात. इतर सर्व प्रकारचे प्रोजेक्टरमध्ये
तीन चिप्स वापरतात ज्याला पॅनेल्स देखील म्हणतात. (प्रतिमेतील प्रत्येक प्राथमिक रंगासाठी
एक) एलपी प्रोजेक्टरमध्ये एकच चिप वापरतात. तरी देखील त्यांची प्रतिमा क्लिअर येते
याचा अर्थ असा की, डीएलपी प्रोजेक्टरची प्रतिमा रेंज तिक्ष्ण आहे.
हे साध्य करण्यासाठी सिंगल चिप डीएलपी प्रोजेक्टर
तीन प्राथमिक रंगादरम्यान फिरणारी कलर व्हील वापरतात. थ्री चिप डीएलपी प्रोजेक्टर बहुतेक
चित्रपटगृहात वापरतात. थ्री चिप डीएलपी प्रोजेक्टर इतर प्रोजेक्टर तंत्रज्ञानापेक्षा मोठ्या, उजळ प्रतिमा तयार करण्यास
सक्षम आहेत.
ते चार पर्यंतच्या रिझोल्यूशनमध्ये देखील उपलब्ध
आहेत, तसेच त्यांच्याकडे इतर प्रकारच्या प्रोजेक्टरपेक्षा अधिक रंग तयार करण्याची क्षमता
आहे. हे प्रोजेक्टर सामान्यत: थ्रीडी चित्रपट पाहण्याकरिता सर्वोत्तम असतात. थ्री चिप
डीएलपी प्रोजेक्टर वेगवान असल्याने व्हिडीओ गेमसाठी चांगले आहेत.
२) एलसीडी (LCD-Liquid Crystal Display)
एलसीडी प्रोजेक्टर डीएलपी आणि एलसीओएस प्रोजेक्टरच्या मध्यभागी येतात.
ते डीएलपी प्रोजेक्टरसारखे तेजस्वी नाहीत परंतू ते सामान्यत: एलसीओएस प्रोजेक्टरपेक्षा
उजळ असतात.
एलसीडी प्रोजेक्टरव्दारे निमिग्त थ्रीडी प्रतिमा डीएलपी प्रोजेक्टरव्दारे
निर्मित थ्रीडी प्रतिमांपेक्षा कमी अचूक असू शकतात. परंतु एलसीडी प्रोजेक्टर चमकदार
प्रतिमा तयार करण्याच्या क्षमतेमुळे एलसीओएस प्रोजेक्टरला मागे टाकू शकतो. सिंगल चिप
डीएलपी प्रोजेक्टर सारख्याच किंमती पासून प्रारंभ होणारे एलसीडी जेक्टर परवडणारे आहेत.
३) एलसीओएस (LCoS-Liquid Crystal on Silicon)
यामध्ये प्रकाश स्त्रोतासाठी दिव्याऐवजी सॉलिड स्टेट लेसर वापरतात. एलसीडी प्रोजेक्टर प्रमाणे एलसीओएस प्रोजेक्अर प्रतिमा तयार करण्यासाठी पॅनेलव्दारे प्रकाश चमकवतात.
एलसीओएस प्रोजेक्टरचा प्रकाश तीन स्वतंत्र एलसीओएस पॅनेल प्रतिबिंबित करतो. जे नंतर प्रतिमा तयार करण्यासाठी एकत्र केले जातात. पॅनेलव्दारे प्रकाश चमकविण्याऐवजी त्यावरील प्रकाश प्रतिबिंबित करुन, एलसीओएस प्रोजेक्टर कोणत्याही तंत्रज्ञानाचे सर्वात गडद काळा स्तर आणि कॉन्ट्रास्ट गुणोत्तर देतात.
काळोख्या हॉलमध्ये
पाहिल्यास सिनेमास्कोप स्वरुपातील चित्रपटांची छाया अधिक चांगली दिसते. एलसीओएस प्रोजेक्टर
सामान्यत: डीएलपी आणि एलसीडी प्रोजेक्टर इतका ब्राइटनेस देऊ शकत नाहीत, त्यामुळे परिपूर्ण
प्रकाशाच्या खोलीत ते क्लिअर प्रतिमा देऊ शकत नाहीत.
४) लेसर प्रोजेक्टर (LaserProjector)
लेसर प्रोजेक्टर एक असे डिव्हाइस आहे की जे मनोरंजन किंवा व्यवसायीक वापरासाठी फिरणारी प्रतिमा तयार करण्यासाठी प्रोजेक्ट करते. यात लेसर, मिरर, गॅल्व्हनोमीटर, स्कॅनर आणि इतर ऑप्टिकल घटक असतात.
लेसर पोजेक्टरमध्ये एक रंग
प्रोजेक्शनसाठी तीन स्त्रोत असू शकतात. चांगल्या रंगासह लेसर उजळ प्रतिमा देतात. होम
इंटरटेनमेंन्ट लेसर प्रोजेक्टर हे वेगवान, झटपट चालू किंवा बंद करता येतात.
प्रोजेक्टर कुठे व कशासाठी वापरला जातो?
१) चित्रपटगृहामध्ये चित्रपट पाहण्यासाठी.
२) मोठया सभागृहामध्ये सभेचे कामकाज पाहण्यासाठी.
३) व्यवसाय विषयक संमेलनात पॉवरपॉईंट सादरीकरण
करण्यासाठी.
४) शाळेत विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी.
५) मोठ्या स्क्रीनवर मूव्हीसह टीव्ही किंवा संगणक
प्रोजेक्ट करण्यासाठी.
६) अधिवेशन केंद्रातील उत्पादन किंवा सेवेचे प्रदर्शन
करण्यासाठी.
७) अधिक गर्दीच्या ठिकाणी होणारा कार्यक्रम सर्वाना
पाहता यावा यासाठी
प्रोजेक्टरचे फायदे काय आहेत?
१) घरगुती करमणुकीसाठी प्रोजेक्टरचा होम थिएटर
म्हणून उपयोग घेता येतो.
२) स्क्रिनचा आकार पाहिजे तसा बदलता येतो.
३) स्क्रीनऐवजी कोणत्याही पृष्ठभागावर ऑपरेट करु
शकता.
४) प्रतिमेचे आकार बदलता येतात.
५) मोठया प्रतिमा सहज पाहता येतात आणि डोळयावर
कमी ताण निर्माण करतात.
६) करमणूकिच्या इतर माध्यमांपेक्षा जागा कमी लागते.
७) प्रोजेक्टर केवळ लहानच नाहीत तर ते वजनाने हलके
आहेत.
८) हाताळण्यास सोपे आहेत.
९) वाहतूक करणे सोपे आहे.
१0) किंमत अगदी वाजवी आहे.
प्रोजेक्टरचे लँप लाइफ वाढवण्यासाठी काय करावे?
प्रोजेक्टरसाठी लँप हा अतिशय महत्वाचा भाग आहे. प्रोजेक्टर जास्तवेळ चालू असेल तर प्रोजेक्टरमध्ये उष्णता निर्माण होते. त्यासाठी प्रोजेक्टरमध्ये कुलिंग व्यवस्था असते तो थंड हवा आत घेऊन गरम हवा बाहेर सोडतो. प्रोजेक्टरचा वापर आणि योग्य देखभाल यासह अनेक घटकांवर प्रोजेक्टरचे लँप लाइफ आधारित असते. उष्णता बिल्डअपमुळे प्रोजेक्टरचे लँप लाइफ कमी होते. आणि आपल्या प्रोजेक्टरचे नुकसान होऊ शकते
प्रोजेक्टरचा लँप अधिक काळ टिकण्यासाठी काय करावे?
प्रोजेक्टरचा लँप अधिक काळ टिकण्यासाठी खालील गोष्टींकडे
लक्ष दया.
१) आपण आपला प्रोजेक्टरचे बंद केल्यानंतर प्रोजेक्टरच्या
फॅनला युनिट योग्य प्रकारे थंड होण्यास नुमती देण्यासाठी अनप्लग करएयापूर्वी अनप्लग
करण्यापूर्वी कमीतकमी पाच मिनिटे थांबावे.
२) प्रोजेक्टर बंद करताना ताबडतोप पॉवर बटन बंद
करु नये.
३) प्रोजेक्टरवरती प्लॅस्टिक किंवा इतर कागद धुळीपासून
संरक्षण करण्यासाठी ठेवू नयेत. कारण त्यामुळे प्रोजेक्टरचे एअर फिल्टर झाकले जातात.
प्रोजेक्टरला थंड हवा मिळत नाही त्यामुळे प्रोजेक्टरचे लँप लाईफ कमी होते.
४) प्रोजेक्टर आणि प्रोजेक्टरची स्क्रीन यामध्ये
योग्य अंतर असावे.
५) आपण वापरत असलेला प्रोजेक्टर हॉलमध्ये असलेल्या वातावरनानुसार प्रोजेक्टरचे एअरसेवन फिल्टर दर दोन ते तीन महिन्यांत स्वच्छ करावे.
प्रोजेक्टर खरेदी करताना महत्वाच्या बाबी कोणत्या आहेत?प्रोजेक्टर खरेदी करताना खालील महत्वाच्या बाबी
विचारात घेतल्या पाहिजेत.
१) प्रतिमेचा आकार आणि अंतर
२) योग्य प्रतिमेचा आकार सुनिश्चित करण्यासाठी
योग्य थ्रो रेश्यो.
३) भविष्यातील प्रुफिंग, गुणवत्ता यासाठी HDmi कनेक्शन.
४) योग्य किंमत
सारांष
अशा प्रकारे माहिती प्रोजेक्टरची या लेखामध्ये प्रोजेक्टर या आऊटपुट डिव्हाइस विषयी दिलेली माहितीचा आपणास उपयोग होईल अशी आशा करुया.