या लेखामधील महत्वाचे मुद्दे
     या लेखामधील महत्वाचे मुद्दे


प्रत्येक व्यक्तीला कोणत्या न कोणत्या सवयी असतातच. मग त्या चांगल्या असतील किंवा वाईट असतील पण सवयी मात्र प्रत्येकाला असतात. सवयींचा परिणाम आरोग्यावर अगदी कमी कालावधीतच होऊ शकतो.

सवय म्हणजे काय? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत व्यक्तींकडून कळत, नकळत घडणारी क्रिया किंवा एखादी कृती जी सतत किंवा वारंवार करणे म्हणजे सवय होय. सवयीमध्ये वर्तनांची पुनरावृत्ती केली जाते. जुन्या सवयी मोडणे आणि नवीन सवयी तयार करणे हे कठीण आहे कारण मानवांच्या पुनरावृत्ती करण्याच्या वर्तणुकीचा मनावर व शरीरावर घट्ट व खोलवर प्रभाव पडलेला असतो. परंतु पुनरावृत्तीद्वारे नवीन सवयी तयार करणे शक्य आहे.

वाईट सवयी कोणत्या आहेत?½What are bad habits?

खोकताना किंवा शिंकताना तोंडाला रुमाल न लावणे, वारंवार हात स्वच्छ न धुणे, मेक अप न धुता झोपणे, चेह-यावरील मुरुमांबद्दल जास्त चिंता करणे, बका-बका खाणे, उंच टाचांची चप्पल जास्तवेळ वापरणे, जास्तवेळ टीव्ही पाहणे, बोटाने नाक टोकरणे किंवा नाकात सतत बोट घालणे, जेवणाची वेळ न पाळता केंव्हाही खाणे, पँट खाली सरकत नसतांनाही ती वारंवार वरती ओढणे, मानेला झटका देऊन केस वरती घेणे, गरज नसतांनाही नाकाला सतत हात लावणे, सतत खोटे बोलणे, कुठेही थूंकणे, बोटाची नखं चावणे किवा कुरतडणे, रात्री उशिरा झोपणे, बोलतांना विशिष्ट शब्द सतत वापरणे, मोबाईलवर सतत गेम खेळणे, नकारात्मक दृष्टीकोन, इतरांना दोष देणे, अधूनमधून एक डोळा झाकणे किंवा दोन्ही डोळयांच्या पापण्यांची वेगात उघड झाक करणे, स्वच्छता न पाळणे, धूम्रपान करणे, कामावर नेहमी उशिरा जाणे, वेळेचे बंधन न पाळणे, कित्येक तास इयरफोन वापरणे, सतत दुस-याचा अपमान करणे, चांगल्या कामात नेहमी अडथळा आणने, जेवताना तोंडाचा आवाज करणे, चहा पितांना जोरात फुरका मारणे, कारण नसतांनाही दुस-याशी भांडणे, दुस-यांमध्ये भांडणे लावणे, चहाडी करणे, इ. त्या व्यक्तीची क्रिया चांगली असेल तर त्याला चांगली सवय आहे असे म्हटले जाते आणि जर वाईट क्रिया असेल तर त्याला वाईट सवय आहे असे म्हटले जाते. अर्थात हे ठरवण्याचा मापदंड प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. चांगले किंवा वाईट हे ठरवणे व्यक्तीपरत्वे बदलते.

समाजातील प्रत्येक व्यक्तीला कोणत्या न कोणत्या सवयी असतातच. मग त्या चांगल्या असतील किंवा वाईट असतील पण सवयी मात्र प्रत्येकाला असतात. चांगल्या सवयींची सुरुवात बालपणापासून झाली तर त्यांचा आयुष्यभर चांगला परिणाम दिसून येतो. वाईट सवयी शिकवाव्या लागत नाहीत, तर त्या न कळत मुले शिकतात. बालपणात लागणा-या वाईट सवयींकडे जर पालकांनी दुर्लक्ष केले तर त्या सवयी बदलणे कठीण जाते. कालांतराने त्याचे वाईट परिणाम देखील भोगावे लागतात.

सवयी आणि त्यांचे होणारे परिणामHabits and their consequences



शिंकताना किंवा खाेकताना तोंडाला रुमाल न लावणे


कोरोना विषाणूचा प्रसार खोकला किंवा शिंकेतून बाहेर पडणाऱ्या छोट्या छोट्या थेंबांमधून किंवा हे थेंब पडलेल्या जागी स्पर्श केलेला हात नाका- तोंडाला लागल्यानं होत असल्याचं आतापर्यंतच्या संशोधनातून असे  दिसून आलं आहे. तसंच गर्दीच्या ठिकाणी अशा संसर्गाचा धोका जास्त असल्याचं तज्ज्ञांनी वारंवार सांगितलं आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी शिंकताना आणि खोकताना टिशू पेपर किंवा रुमाल वापरा. वापरून झाल्यावर तो कचरापेटीत टाकून हात स्वच्छ धुवा.

खोटे बोलणे


मला माहित आहे की हा नैतिकतेचा वर्ग नाही आणि म्हणूनच, आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की जर तुम्हाला बहुतेकदा खोटे बोलण्याची सवय असेल तर आपण आपल्या आरोग्यावर नकारात्मक मार्गाने परिणाम करुन घेत असतात. जेव्हा आपण खोटे बोलता तेव्हा आपण तणावग्रस्त स्थितीत राहतात कारण आपल्याला भीती वाटते की खोटे बोललेले उघड होते की काय? उलट तुमचा ताण, चिंता, डोकेदुखी आणि इतर अनेक समस्या वाढतात.

बोटाने नाक टोकरणे


केंव्हाही नाकात बोट घालने ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकजण करतो. ही कृती करताना आपण विचार करत नाही की यामुळे आपले नुकसान होऊ शकते. या सवयीचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची वेळ येऊ शकते. जेंव्हा आपण विविध वस्तूंना स्पर्श करतो, तेंव्हा त्या वस्तूवर बॅक्टेरिया किंवा विषाणू असू शकतात, आपण त्या वस्तूला स्पर्श केल्यामुळे ते आपल्या हाताला लागू शकतात आणि आपण तेच बोट नाकात घातल्यास त्या बोटावरील विषाणूला आपण नाकापर्यंत घेऊन जातो आणि शरीरावर संक्रमणाचा धोका निर्माण करतो.  वारंवार नाकात बोट घालण्याची सवय असेल तर सर्दी होण्याची अधीक शक्यता असते कारण त्यामुळे शरीरात व्हायरस पोहचतात. तसेच बोटाने दातात अडकलेले अन्नाचे कण काढण्याचा देखील प्रयत्न करु नये. सद्याच्या या कोरोनाच्या काळात प्रत्येकाने ही काळजी घेणे गरजेचे आहे. या कोरोना संक्रमणाच्या भितीनेकाहोईना पण ही सवय बंद करा.

बरेचजण आपल्या वाईट सवयी सोडण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी अतोनात, अगदी पराकोटीचे प्रयत्न करतात. ज्यांचा मनावर ताबा असतो ते त्यावर नियंत्रण मिळवितात पण सर्वानाच त्यात यश मिळते असे नाही.

मोबाईलवर गेम खेळणे


बरेचजण आपला अमूल्य वेळ मोबाईलवर गेम खेळण्यात घालवतात, तुमच्या अशा सवयींचा काळजीपूर्वक विचार केला, तर तुमच्या लक्षात येईल, की तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काही क्षुल्लक कारणांसाठी खर्च केलाय. जो इतर चांगल्या कारणांसाठीही वापरता आला असता; म्हणूनच काही अनावश्यक आणि वाईट सवयी सोडणे गरजेचे आहे.

धूम्रपान करणे


आपणास हे माहित आहे की धूम्रपान करणे आरोग्यास हानिकारक आहे. तसे ठिकठिकाणी बोर्डही लावलेले असतात. धूम्रपानासाठी वापरल्या जाणा-या वस्तूवरही तसा संदेश असतो, आपण हे चर्व वाचतो, ऐकतो तरीही धुम्रपान करतो. बहुतेक धूम्रपान  करणार्‍यांना त्याचे कारण विचारले तर ते मला याचे टेंन्शन होते त्यामुळे मी हे करतो, अशी उतरे देतात, वास्तविक ही पळवाट त्यांनी शोधलेली असते. धूम्रपान केल्याने खरोखर टेंन्शन कमी होते का? तर नाही उलट ती व्यक्ती त्याच्याबरोबर कुटुंबातील इतर व्यक्तींचे टेन्शन वाढवते. सततच्या धूम्रपानामुळे रक्तात गिठळया होऊ शकतात. त्याचबरोबर त्यांच्या सहवासात येणा-या व्यक्तीच्या शरीरावरही त्याचा परिणाम हातो.                                                      [हे ही वाचा २०० वाईट सवयी]       

जेवणाची वेळ न पाळता केंव्हाही खाणे


आपण जेवणाची वेळ ठरवून बरोबर ठरवलेल्या वेळी जेवण घेत असाल तर भूकेचे सिग्नल योग्य प्रकारे काम करतात. म्हणजे ठरलेल्या वेळी भूक लागते.  जर आपण आपल्या जेवणाची वेळ ठरवलेली नसेल तर आपल्या शरीराची भूक सिग्नल त्यांना पाहिजे तेव्हा येत नाहीत. भूक नसताना आपण खाऊ शकता. पण बर्‍याचदा असे केल्यास, आपल्या शरीरात अतिरिक्त कॅलरीज भरल्या जातात. ही सवय दिर्घकाळ राहीली तर लठ्ठपणा, हृदयरोग, मधुमेह, ॲसिडिटी यासारख्या समस्या निर्माण करुन आरोग्यावर गंभीर संकट आणू शकते.

रात्री उशिरा झोपणे


रात्री जास्त वेळ टीव्ही पाहणे, उशिरापर्यंत मित्रांबरोबर गप्पा मारणे, बरेच विद्यार्थी परीक्षा जवळ आल्यानंतर पहाटेपर्यंत अभ्यास करतात. अशा विविध करणामुळे बरेचजण रात्री झोपण्यास उशिर करतात. मला असे वाटते की जोपर्यंत आपल्या क्रियांचा कोणताही शारीरिक दुष्परिणाम दिसत नाही तोपर्यंत हे सर्व चांगले आहे. पण हे सत्य नाही. दीर्घ कालावधीपर्यंत जर आपण सहा तासांपेक्षा कमी झोपत असाल तर तुमची प्रतिकारशक्ती आणि इतर शारीरिक प्रक्रिया कमकुवत होण्याची शक्यता जास्त असते. जेव्हा आपली रोग प्रतिकारशक्ती कमकुवत होते, तेंव्हा जंतू संक्रमण आणि रोगांचा धोका अधिक वाढतो. जास्त जागरण केल्यामुळे अपचन, ॲसिडिटी आणि दुस-या दिवसाच्या कामावर देखील त्त्याचा परिणाम होतो. शरीर निरोगी राहण्यासाठी शरीराला किमान सहा ते सात तासाच्या विश्रांतीची गरज असते.

मेक अप न धूता झोपणे


बर्‍याच वेळा स्त्रिया थकल्यासारख्या घरी येतात आणि लगेच अंथरुणावर लोळतात. जेवण झाले की लगेच झोपतात. मेकअप न काढता झोपणे ही सवय त्वचेसाठी घातक आहे. मेकअपमुळे चेह-यावरील त्वचेची छिद्रे बंद झालेली असतात त्यामुळे त्वचा खराब होऊ शकते. तसेच डोळ्यांचा मेकअप काढून टाकणे गरजेचे असते कारण डोळे अधिक संवेदनशील असतात, कमी प्रतिचा मेकअप दररोज वापरण्याच्या सवयीमुळे दृष्टी कमी होऊ शकते.

कित्येक तास इयरफोन वापरणे


प्रवास, काम, नोकरी किंवा अभ्यास करत असताना आपल्यापैकी बर्‍याच जणांना कित्येक तास सतत इयरफोनमध्ये प्लग इन करण्याची सवय असते. ही सवय खरोखरच वाईट आहे. दीर्घकाळापर्यंत इयरफोन कानात ठेवून आवाज ऐकला तर त्याचा ऐकू येण्यावर परिणाम होऊ शकतो. इअर फोनचा वापर गरजेपुरताच करा, आणि मोठा आवाज नसावा.

चेह-यावरील मुरुमांबद्दल जास्त काळजी करणे


बर्‍याच मुली आपल्या त्वचेच्या त्रुटींबद्दल खूप चिंता करतात. त्यांना त्वचेवर दोष नसलेली त्वचा हवी असते. सततच्या चिंतेमुळे त्या वारंवार मुरुमांना स्पर्श करतात. सततच्या स्पर्शामुळे इन्फेक्शची शक्यता वाढते. या कृतीमुळे त्वचेवर चट्टे देखील होऊ शकतात. तेंव्हा, आपल्या त्वचेबद्दल जास्त काळजी करणे थांबवा. आपण जसे आहात तसे सुंदर आहात.

बोटाची नखं चावणे किवा कुरतडणे


बरेच लोक वेळ घालवण्यासाठी किंवा घाबरतात तेव्हा सतत नखे चावतात. ही सवय केवळ एक वाईट व्यक्तिमत्त्वाचा हावभाव नाही तर एखाद्याच्या आरोग्यासाठीही वाईट आहे कारण जेव्हा आपण वेगवेगळ्या पृष्ठभागास स्पर्श करतो, तेंव्हा त्यावरील जीवाणू आणि विषाणू आपल्या बोटांवर चिकटतात. नखे चावण्याची सवय असलेल्या लोकांना सर्दी आणि फ्लू होण्याची अधिक शक्यता असते.

बका-बका खाणे


बहुतेक वेळा वेळेच्या अभावामुळे बरेचजण अर्धवट चाऊन तसाच घास गिळूण पाच मिनिटांत आपले जेवण संपवतात. ही सवय खरोखरच वाईट आहे कारण यामुळे गॅस, अपचन, ॲसिडिटी होऊन पोटाचे विकार निर्माण होऊ शकतात.

नकारात्मक दृष्टीकोन


सतत नकारात्मक विचार करणे ही वाईट सवय आहे. काहीजण ब-याच गोष्टींचा नकारात्मक विचार करतात. मला हे जमेल की नाही, नाही जमले तर काय होईल? हे केले तर माझे नुकसान होईल काय? असे नकारात्मक विचार करण्याऐवजी सकारात्मक रहा, सर्व ठीक होईल, असा विचार करा. हायपर न होता मित्रांमध्ये मिसळा, त्यांचा सल्ला घ्या, अनेकांच्या विचारांमधून योग्य मार्ग सापडतो, सकारात्मकतेमध्ये प्रचंड शक्ती असते. आपण मानसिक ताणतणावात असताना शारीरिक प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते, म्हणून नकारात्मक दृष्टीकोन बदला.

उंच टाचांची चप्पल जास्तवेळ वापरणे


काहींना सतत उंच टाचा असलेली चप्पल वापरण्याची सवय असते. सततच्या वापरामुळे ते आरामदायक वाटत असले तरी, डॉक्टर सांगतात की दररोज उंच टाचांची चप्पल घालून काम केल्याने पाठदुखी, संधिवाताचा त्रास, व पाठीशी संबंधित इतर समस्या उदभवू शकतात. जर आपल्याला त्या वापरायच्याच असतील तर दीड इंचापेक्षा जास्त उंच नसाव्यात.

इतरांना दोष देणे


काहीजण आपल्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक अपयशाचे खापर इतरांवर फोडतात. इतरांना दोष देण्यापेक्षा आपण आत्मपरीक्षण करा. आपल्या चूका, दोष शोधा, अपयशाची कारणे शोधा, त्यावरील उपाय शोधा. अपयशाचे खापर इतरांवर फोडून तात्पुरते समाधान मिळते, उपाय मिळत नाही.

जास्तवेळ टीव्ही पाहणे


सुट्टीचा काळ किंवा शनिवार, रविवार आहे म्हणून आपण टीव्हीला चिकटून राहतो, परंतु बहुतेक वेळेस ती सवय किती हानीकारक ठरु शकते याचा विचार न करता, जर आपण टीव्ही समोर बरेच तास घालवले तर हृदय आणि डोळ्याच्या समस्येचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच, या सवयीमुळे हृदयरोग, स्ट्रोक आणि लठ्ठपणाचे धोके वाढू शकतात. हे आपल्याला आळशी बनवते, चरबी आणि साखरेच्या पातळीवर परिणाम करु शकते.

अशा या वाईट सवयी बद्दलची ही गोष्ट वाचा.


एका श्रीमंत व्यावसायिकाला आपल्या मुलाच्या वाईट सवयीबद्दल काळजी होती. त्याने एका शहाण्या, वृद्ध माणसाचा सल्ला घेतला. म्हातारा त्या माणसाच्या मुलाला भेटला आणि त्याला बाहेर फिरायला नेले. ते जंगलात गेले आणि त्या वृद्ध व्यक्तीने मुलाला एक लहान रोपटे दाखवले आणि ते त्यास उपटण्यास सांगितले. मुलाने ते रोपटे अगदी सहज उपटले, आणि ते पुढे चालू लागले.

त्या म्हातार्‍याने मुलाला एक लहान रोप उपटण्यास सांगितले. मुलानेही ते थोडे प्रयत्न करून उपटले. ते चालत असताना त्या वृद्ध माणसाने मुलाला एक लहान झाड उपटण्यास सांगितले. पुढे एक लहान झाड होते, मुलास ते झाड उपटण्यास खूप संघर्ष करावा लागला. शेवटी, त्या वृद्ध व्यक्तीने त्याला एक मोठे झाड दाखविले आणि मुलाला ते उपटण्यास सांगितले.

मुलगा ब-याचवेळा, वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करुनही ते झाड उपटण्यात अयशस्वी ठरला. म्हातारा मुलाकडे पाहतो, हसतो आणि म्हणतो, "तर ही सवयचांगली आहे की वाईट".

यावरुन वाईट सवयीचे मूळ जर घट्ट रुतले तर ते बाहेर काढणे कठीण असते. तेंव्हा सवयीचे मूळ घट्ट रुतन्यापूर्वीच त्यापासून सुटका करणे चांगले.                           [हे ही वाचा २०० वाईट सवयी]

आपला अभिप्राय व सूचना जरुर कळवा.