Image Source

वीन लॅपटॉप घेताय? सल्ला हवाय?

मग ही माहित जरुर वाचा

योग्य लॅपटॉपची निवड करणे तसे अवघड आहे. परंतू या माहितीचा आपणास योग्य लॅपटॉपची निवड करण्यासाठी निश्चितच उपयोग होईल.

पूर्वी एखादी नवीन वस्तू खरेदी करायची असेल तर आपण वर्तमानपत्रात येणारी जाहीरात किंवा प्रत्यक्ष दुकानात जाऊन वस्तू पाहून खरेदी करत असायचो. म्हणजे आपण खरेदीसाठी पारंपारिक खरेदी पध्दत वापरत होतो.  परंतू आजकाल सोशल मिडियाच्या जमान्यामध्ये कुठल्याही वस्तूची निवड करणे तसे सोपे व्हायला हवे होते परंतू ते सोपे तर नाहीच उलट गोंधळ उडविणारे झालेले आहे. त्याचे कारण म्हणजे विविध प्रकारच्या माध्यमातून होणारा जाहिरातींचा प्रचंड भडीमार आणि संप्रेषणाची विविध साधणे. अशावेळी नेमकी कोणत्या वस्तूची निवड करावी हे कळत नाही. विचार करुन करुन डोक्याचा अगदी भूगा होतो. त्यात ज्यांनी पूर्वी तशी वस्तू घेतलेली असते, त्यांना त्या वस्तूविषयी त्यांचा अनुभव व सल्ला म्हणून विचारले तर, तो आपन घेतलेलीच वस्तू कशी चांगली आहे, हेच पटवून सांगतो. त्यामुळे आपण आणखी गोंधळतो. आपला हा होणारा गोंधळ थांबावा म्हणून नवीन लॅपटॉप खरेदी करणारांसाठी लॅपटॉपविषयी बेसीक माहिती देत आहे. त्याचा आपल्याला निश्चित फायदा होईल.  

लॅपटॉपची निवड कशी करावी?


(How will you choose your Laptop?)


लॅपटॉपची निवड करतांना सर्वात महत्वाचे म्हणजे, आपले कामाचे स्वरुप कसे आहे? आपण लॅपटॉप कोणत्या कामासाठी वापरणार आहात? हे अगोदर विचारात घेणे गरजेचे आहे. आपला वापर एकदा ठरला की मग लॅपटॉपची निवड करणे सोपे होते. How will you choose your Laptop? या प्रश्नाचे उत्त् How will you use your Laptop? या प्रश्नातून मिळते. आपण लॅपटॉप वापरण्याच्या कोणत्या प्रकारामध्ये येतो. हे समजण्यासाठी खाली लॅपटॉप वापराचे प्रकार दिलेले आहेत ते वाचा म्हणजे आपण आपला लॅपटॉप वापराचा प्रकार ठरवू शकतो

लॅपटॉपचा वापर खालील तीन प्रकारामध्ये केलेला आहे.


(Uses of Laptop)


) सर्वसाधारण/ हलका वापर(Light Use)


यामध्ये वेगवेगळया प्रकारची ऑनलाईन बीले भरणे, विविध परीक्षांचे फॉर्म भरणे, साधे डॉक्युमेंट्स तयार करणे, मेल पाठवणे स्विकारणे, सोशल मिडियाचा वापर करणे, चित्रपट पाहणे, पेंटचा वापर करणे, वर्ड तसेच वर्ड पॅडमध्ये डॉक्युमेंट्स तयार करणे, एक्सेल चा वापर, पॉवरपॉइंटमध्ये प्रेझेंटेशन तयार करणे, मुलांना शिकविणे, वेब सर्फिंगसंप्रेषण या अशा अनेक प्रकारची साधी साधी कामे करण्यासाठी वापरला जाणारा लॅपटॉप.  
  

) साधारण/मध्यम वापर(Medium Use)



यामध्ये जास्त टायपिंगची कामे करणे, डॉक्युमेंटस एडिट करणे, कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी रिसर्चची कामे करणे, प्रोफेशनल रिसर्चची कामे करणे, फोटो ब्राऊज आणि एडिट करणे, एका वेळी वेब ब्राऊजरच्या असंख्य टॅब उघडणेएचडी चित्रपट पाहणे .

) अती वापर/ प्रचंड वापर(Heavy Use)


यामध्ये फोटोशॉप, ॲटोकॅड, विडिओ एडिटिंग, हेवी गेम खेळणेप्रोग्राम तयार करणे यावरुन आता आपण लॅपटॉप वापराच्या कोणत्या प्रकारामध्ये येतो हे ठरवता येईल. एकदा तुम्ही तुमचा लॅपटॉप वापराचा प्रकार ठरवला की मग आवश्यक स्पेसिफिकेशन्सची निवड करु शकता

स्पेसिफिकेशन्स (SPECIFICATIONS)


प्रत्येक लॅपटॉपचे स्पेसिफिकेशन्स वेगवेगळे असतातयामध्ये मदरबोर्ड, मदरबोर्डचे प्रकारमदरबोर्डचे घटक यांचाही विचार करणे गरजेचे आहे. लॅपटॉपची कार्यक्षमता खालील घटकांवर अवलुबून असते.

१) प्रोसेसर: (Processor) 

प्रोसेसर हा लॅपटॉपचा एक प्रमुख भाग आहे. त्याला लॅपटॉपचा मेंदू असेही म्हणतात.  मेंदू जर चलाख असेल तर तो निर्णय पटकन घेऊ शकतो. तसेच प्रोसेसरचेही असते. प्रोसेसरवर लॅपटॉपचा वेग अवलंबून असतो

प्रोसेसरचे प्रकार(Types of Processor) 

मायक्रोप्रोसेसर किंवा प्रोसेसर म्हणून ओळखले जाणारे, सीपीयू संगणकाचा मेंदू आहे. हे प्रोग्रामच्या सूचना आणण्यासाठी, डिकोडिंग आणि अंमलात आणण्यासाठी तसेच गणितीय आणि तार्किक गणना करण्यासाठी जबाबदार आहे.

प्रोसेसर चिप ही प्रोसेसरचा प्रकार आणि निर्माता याद्वारे ओळखली जाते. ही माहिती सहसा चिपवरच दिलेली असते. उदा. इंटेल 386, प्रगत मायक्रो डिव्हाइस (एएमडी) 386, सायरिक्स 486, पेंटियम एमएमएक्स, इंटेल कोर 2 ड्यूओ, किंवा आयकोअर 7.

लॅपटॉपचे प्रोसेसर दोन कंपन्या तयार करतात. इंटेल (Intel) एएमडी (AMD)

प्रोसेसरचे इंटेल सिरीजमध्ये खालील तीन प्रकार आहेत



i) इंटेल पेंटियम(Intel Pentium)



प्रोसेसर हा लॅपटॉपचा एक प्रमुख भाग आहे. त्याला लॅपटॉपचा मेंदू असेही म्हणतात.  मेंदू जर चलाख असेल तर तो निर्णय पटकन घेऊ शकतो. तसेच प्रोसेसरचेही असते. प्रोसेसरवर लॅपटॉपचा वेग अवलंबून असतो

प्रोसेसरचे प्रकार(Types of Processor) 


लॅपटॉपचे प्रोसेसर दोन कंपन्या तयार करतात. इंटेल (Intel) एएमडी (AMD)

प्रोसेसरचे इंटेल सिरीजमध्ये खालील तीन प्रकार आहेत 

i) इंटेल पेंटियम(Intel Pentium)


इंटेल पेंटियम प्रोसेसर हे बेसिक लॅपटॉपमध्ये असतातसर्वसाधारण वापर असणारे, हा प्रोसेसर वापरु शकतात

ii) इंटेल सेलेरॉन(Intel Seleron)

इंटेल सेलेरॉन प्रोसेसर हे इंटेल पेंटियम प्रोसेसरपेक्षा जास्त पॉवरफुल आहेत. साधारण वापरकर्ते हा प्रोसेसर असलेला लॅपटॉप वापरु शकतात 

iii) इंटेल कोर आई: (Intel Core i)

यामध्ये i3, i5, i7 & i9 हा प्रोसेसर इंटेलच्या प्रोसेसरमध्ये सर्वात शक्तिशाली प्रोसेसर आहे. या प्रोसेसरची निवड लॅपटॉपचा अतीवापर करणार असाल तर जरुर करावी.   

प्रोसेसरच्या एएमडी सिरीज मध्ये A2, A4, A6 A9, A10 A12 हे प्रोसेसरचे प्रकार आहेत. (A, FX & Ryzen 3, 5, 7) 

या प्रोसेसरच्या प्रकारांमध्ये अंकांच्या चढत्या क्रमानुसार प्रोसेसरचा वेग किंवा पॉवर ठरवलेला आहे.

लॅपटॉप वापरण्याच्या प्रकारानुसार इंटेलचा प्रोसेसर कोणता असावा हे या तक्त्यावरुन लक्षात येईल.

वापर प्रकार
पेंटियम
सेलरॉन
आई3
आई5
आई7
आई9

हलका वापर
2-4 core
1.3 to1.6
GHz
2-4 cores
1.1 to 3.7
GHz
2-4 cores
1.9 to 4.0 GHz




मध्यम वापर

2-4 cores
1.2 to 3.7
GHz
2-4 cores
1.9 to 4.0 GHz
2-4 cores
1.9 to 4.0 GHz



प्रचंड वापर




2-6 cores
2.40to 4.00
GHz
8 cores
2.40to 5.00
GHz

लॅपटॉप वापरण्याच्या प्रकारानुसार एएमडी सिरिजनुसार प्रोसेसर कोणता असावा हे या तक्त्यावरुन लक्षात येईल. 

वापर प्रकार
एएमडीई२
एएमडीई ४ ते ६
एएमडीई ९ ते १२
एएमडी
Ryzen3
एएमडी
Ryzen5
एएमडी
Ryzen7

हलका वापर
2 core
1.8 to2.8
GHz
2-4 cores
1.0 to 2.0
GHz
2-4 cores
2.4 to 3.0 GHz




मध्यम वापर

2-4 cores
1.0 to 2.0
GHz
2-4 cores
2.4 to 3.0 GHz
2-4 cores
2.0 to 2.6 GHz



प्रचंड वापर




4 cores
2.0to 3.2
GHz
6cores
2.2to3.3
GHz

२) रॅम किंवा मेमरी: (RAM- Random Access Memory) 

रॅम ही लॅपटॉपची इंटर्नल मेमरी आहे. आपण ओपन केलेल्या सर्व फाईल्स रॅम मध्ये साठवल्या जातात. लॅपटॉप साधारण जीबी, जीबी किंवा १६ जीबी रॅमसह येतात.  रॅम जास्त तर इंटर्नल मेमरी जास्त जीबी रॅम असलेला लॅपटॉप निवडल्यास  नंतर रॅम अपग्रेडेशनची वेळ येत नाही. परंतु लॅपटॉपचा अती वापर करणार असाल तर १६ जीबी रॅम असलेला लॅपटॉप निवडणे अधिक उत्तम

 ) हार्ड डिस्क: (Internal Storage)

या मेमरीमध्ये लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल केलेले सर्व सॉफटवेअर ऑपरेटिंग सिस्टिम सह साठवले जातात. जर मेमरी कमी असेल, आणि तुम्ही जास्त प्रोग्राम इन्स्टॉल केले तर लॅपटॉपचा वेग कमी होतो.
स्टोअरेज:

साधारणपणे लॅपटॉपच्या स्टोअरेजचे तीन प्रकार आहेत.

1) HDD: (Hard Disk Drive हार्ड डिस्क्ड्र्राइव्ह)

ही हार्ड डिस्क्थोडी धिमी मानली जाते कारण त्यामध्ये डेटा वाचण्यासाठी फिरणारे भाग असतात.

2) SSD: (Solid-State Drive सॉलिड स्टेट ड्र्राइव्ह

सॉलिड स्टेट ड्र्राइव्ह या हार्ड डिस्क्ड्र्राइव्ह पेक्षा अधिक वेगवान आहेत परंतू किंमतही जास्त आहे
ही डिस्क्ड्र्राइव्ह पाच सेकंदापेक्षा कमी वेळात विंडोज सुरु करु शकते. वेग जास्त पण किंमतही जास्त.

3) SSHD: (Solid-State Hybrid Drive सॉलिड स्टेट हायब्रिड ड्र्राइव्ह) 

सॉलिड स्टेट हायब्रिड ड्र्राइव्ह मध्ये स्टोअरेज क्षमता प्रचंड आहे तसेच लोडींगचा वेगही जास्त आहे.

) डिस्प्ले(Display)

आपल्या गरजेनुसार १४ इंची, १५ इंची किंवा १७ इंची डिस्प्लेची निवड करावीडिस्प्ले निवडतांना लॅपटॉपची बॅटरी बॅकअप आणि लॅपटॉपचे वजन याचाही विचार करावा.  स्क्रीनचा आकार जास्त असेल तर बॅटरी बॅकअप कमी मिळेल लॅपटॉपचे वजनही वाढेल.  

) लॅपटॉप बॅटरी : (Battery)

विदयुत पुरवठा बंद झाला तरी बॅटरीमुळे लॅपटॉप चालू राहतो. ज्या ठिकाणी वीज नसेल त्या ठिकाणीही आपण लॅपटॉप वापरु शकतो, परंतू लॅपटॉप बॅटरी चार्ज असली पाहिजे. बॅटरी बॅकअपवर स्क्रीन ब्राइटनेस, गेम, व्हिडिओ, वायफाय, ब्लूटुथ यांचा जास्त परिणाम होतो. साधारण बॅटरी Watt-Hour (WHr) मध्ये मोजली जाते. जेवढे WHr जास्त तेवढा बॅटरी बॅकअप जास्तबॅटरी बॅकअप जास्त हवा असेल तर लॅपटॉपचे वजन वाढते.   

) ग्राफिक्स कार्ड(Graphics Card)

हे लॅपटॉपमध्ये चिपच्या स्वरुपात असतात. लॅपटॉपची स्क्रीन क्वालिटी ग्राफिक्स्कार्डवर अवलंबून असतेआपले काम ग्राफिक्सशी संबंधित असेल तर ग्राफिक्सकार्ड मेमरी स्वतंत्र असलेल्या लॅपटॉपची निवड करावी.  

) युएसबी(Universal Serial Bus युनिव्हर्सल सिरिअल बस)


युएसबीचे लेटेस्ट व्हर्जन USB 4.0 निवडावे, इंटर्नल माईक असावाएचडी क्वालिटीचा इनबिल्ट कॅमेरा असावा, साऊंड क्वालिटी चांगली असावी.

या सर्व माहिती वरुन लॅपटॉपची कार्यक्षमता ही लॅपटॉप स्पेसिफिकेशन्स (Laptop Specifications) प्रोसेसर, रॅम, इंटर्नल मेमरी, ग्राफिक्सकार्ड, बॅटरी, या सर्वावर अवलंबून असते. आपल्या कामाच्या स्वरुपानुसार या सर्वांची निवड केली तर आपण योग्य लॅपटॉपची निवड कराल.

संगणक किंवा लॅपटॉप विषयी वापरकर्त्याला खालील माहितीचे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे. जसे संगणकाचा मदरबोर्ड, मदरबोर्डचे प्रकार, मदरबोर्डचे घटक, संगणक हार्डवेअरसंगणकसॉफ्टवेअर, संगणक इनपुट डिव्हाइस व आउटपुट डिव्हाइस, हार्ड कॉपी व सॉफ्ट कॉपी, युएसबी पोर्ट, संप्रेषण ऑनलाईन खरेदीसाठी लॅपटॉपचा वापर यांचाही विचार करणे गरजेचे आहे.