आपली मुले आरोग्यदायी पदार्थ खात नसतील तर या कल्पना वापरुन पहा.
आपल्या मुलांनी निरोगी पदार्थ खाण्यासाठी टिप्स (Tips for your children to eat healthy foods)
आपण आपल्या मुलांना अति-निरोगी पदार्थ खाण्यास कसे प्रवृत्त करु
शकता? त्यासाठी या कल्पना वापरुन पहा.
या आर्टिकल मधील ठळक मुद्दे
(Main points)
हे खा...! नाहीतर….! बहुतेक वेळा हे शब्द आपण ऐकले असतील, कदाचित आपल्या घरातही ऐकले
असतील. ते कोणासाठी वापरले जातात? आणि हे शब्द वापरतांना चेह-यावरती रागही दिसतो. गैरसमज
करुन घेऊ नका मुलं जेवत नाही, किंवा आपल्याला मुलांनी जे पदार्थ खायला
हवेत असे वाटते ते मुलं खात
नाहीत, तेंव्हा चिडलेल्या आईच्या तोंडून आपल्या मुलांसाठी हे शब्द वापरले जातात. असे
शब्द मुलांसाठी वापरायला हवेत का? तर ९९% लोक नाही असे म्हणतील पण मुलांसाठी हे शब्द
वापरण्याची आईला तर मुळीच इच्छा नसते, परंतू राग अनावर झाल्यानंतर वैतागून आई हे शब्द
वापरते. रागाने बोलल्यानंतर तरी मुल ते खाईल अशी भाबडी आशा आईची असते.
आपली मुले आरोग्यदायी पदार्थ खात नसतील तर या कल्पना वापरुन पहा. (If your children are not eating healthy foods, try these ideas)
स्वयंपाकात मुलांना सहभागी करा (Involve children in cooking)
स्वयंपाक करताना आपल्या मुलांना
त्यात सामील करा, स्वयंपाकासाठी लागणारे वेगवेगळे पदार्थ जे त्यांना इजा न होता, न
फोडता किंवा न सांडता सहज आणता येतील असे पदार्थ आनण्यास सांगा. छोट्या हातांना
स्वयंपाक घरातील इतर छोटी-छोटी कामे करु
दया. मुलं ती आवडीने करतील. त्यात थोडे नुकसान झाले तरी रागावू नका. ते जर भाज्या किंवा फळभाज्या चिरु शकत असतील तर ते त्यांना करण्यास सांगा.
त्यांनी प्रत्यक्ष या कामामध्ये मदत केलेली असल्यामुळे आपण मदत करुन तयार केलेले
पदार्थ कसे होतात? ते कसे लागतात? या विषयी उत्सुकता त्यांच्या मनात असते.
यापूर्वी त्यांनी तो पदार्थ कधिही खाल्लेला नसेल तरी, आता त्यांना तो खाण्याची
इच्छा निर्माण होईल. कारण तो तयार करण्यामध्ये त्यांचा सहभाग होता.
स्वयंपाकात मदत करत असताना मुलं
स्वयंपाकघरात वावरतील, तो पदार्थ तयार होत असतांना त्याचा गंध स्वयंपाक घरात
दरवळतो, त्यामुळे भूक वाढण्यास मदत हाते. तसेच स्वयंपाक करणे हे किती किचकट आणि
जबाबदारीचे काम आहे याची जाणीव होईल. नंतर मुलं मला हे नको, ते नको किंवा मला अमुक
एक पदार्थ तयार करुन दे असे म्हणन्याचे धाडस करणार नाहीत. कारण त्यांना तो पदार्थ
तयार करण्यामागील आईचे कष्ट समजतील.
मुलांच्या सहभागाने तयार केलेला
पदार्थ मुलं खात असतांना त्यांच्याबरोबर त्या पदार्थाची चव या विषयावर बोला, त्यात
आणखी काय असायला हवे होते म्हणजे तो पदार्थ आणखी रुचकर झाला असता या विषयी त्यांना
विचारा. जेणेकरुन मुलांमध्ये मदत करण्याची आवड निर्माण होईल.
खाण्याचे पदार्थ मुलांना स्वत:च्या हाताने घेऊ द्या. (Let the children take the food with their own hands)
आपण जर मुलांना अन्न पदार्थ वाढले
तर त्यांना किती अन्नाची गरज आहे हे आपल्याला माहित नसते, त्यांच्यादृष्टीने ते
पदार्थ जर जास्त असतिल तर मुलं चिडचिड करायला सुरुवात करतात, त्यात ते जेवढे खाणार
असतील ते खाण्याचीही त्यांची इच्छा मरते. त्यामुळे मुलांना त्यांच्या हाताने,
त्यांच्या गरजेनुसार पदार्थ घेऊ द्या. मुलं त्यांना जे खायला आवडेल ते घेतील
त्यामुळे पदार्थ ताटात शिल्लक राहणार नाहीत.
मुलांचे रोल मॉडेल बना (Become a role model for children)
तुंम्हाला जे पदार्थ आवडत नाहीत ते
पदार्थ मुलांनी खावेत असा आग्रह धरु नका. कारण मुलं घरामध्ये आपली प्रत्येक हालचाल
पहात असतात. त्यांनाही तुमच्या आवडी निवडी माहित असतात त्यामुळे तुम्ही तसे
केल्यास उलट तुमच्याबद्दल अनादर निर्माण होईल. दर ३-४ तासानंतर स्वत: खा आणि
मुलांनाही खाऊ घाला. खात असतांना एकमेकांची गंमत करा, गप्पा मारा, त्यांच्या
आवडीच्या विषयावर बोला. जेनेकरुन मुलांचे मन प्रसन्न राहील ते करा. मुलं जर एखादा
पदार्थ खात नसतील, म्हणजे त्यांना तो आवडत नसेल तर तो खाण्याचा आग्रह करु नका.
मुलांना सक्तीने आहार घेण्यास भाग पाडू नका. ते एखादा पदार्थ खात नसतील तर
त्यांच्यावर ओरडू नका. जोरात ओरडल्यानंतर मुलं कदाचित ते खातीलही पण त्यांच्या
मनामध्ये तुमच्याबद्दल भिती किंवा धास्ति निर्माण होऊ शकते. त्यामुळे पालकांनी
शांत राहणे महत्वाचे आहे.
घरातील वातावरण आनंदी ठेवा (Keep the atmosphere in the house happy)
जेवणाचे वेळेस घरात आनंदी वातावरण
असणे अत्यंत महत्वाचे असते. घरातील वातावरण आंनदी ठेवण्यात वडिल सर्वात जास्त
जबाबदार असतात. जेवताना खाण्याच्या पदार्थावरुन वडिलांनी मुलांच्या समोर आई किंवा
पत्नीला बोलू नये, जेवणाच्या वेळी आपल्या एखादया शब्दाने वातावरण बिघडते, त्यामुळे
जेवणावरची सर्वांचिच इच्छा कमी होते. त्यासाठी मुलांच्या समोर जेवणाच्या वेळी
वडिलांनी कधीही रागावू नये. त्याउलट खाण्यासाठी घरात उपलब्ध असलेले इतर पर्यायी
पदार्थ सुचवावेत. पर्यायी पदार्थ मुलांच्या आवडीचे असतील तर ते जास्त आनंदी होतील,
आनंदाने जेवतील व समाधानी होतील.
जेवताना नकारात्मक भाषा वापरु नका (Do not use negative language while eating)
घरातील वडीलधा-या मंडळिंनी एखादा
पदार्थ आवडत नसेल तर, मुलांच्या समोर मला हे आवडत नाही, ते आवडत नाही, तो पदार्थ
का केला नाही, तुला कळत नाही का, मला त्याची ॲलर्जी आहे, तुला किती वेळा सांगितले
मी ते खाणार नाही. असे नकारात्मक शब्द जर वडीलधा-यांनी वापरले तर मुलंही त्यांचेच
अनुकरण करतात. तेंव्हा जेवताना नकारात्मक भाषा वापरणे टाळावे.
मुलांना लालची बनवू नका (Don’t make kids greedy)
काही पालक आपली मुलं जेवत नाहीत
अशावेळी तु हे खाल्ले तर तुला चॉकलेट देईल. तु जेवलास तर तुला खेळणी देईल अशा
पद्धतीने मुलांना लालची बनवू नका. त्यामुळे मुलांची खाण्याची नकारात्मकता वाढते.
मुलांना त्याची सवय लागते व प्रत्येक जेवणाच्या वेळी आपण हट्ट केला तर काहितरी
मिळेल याची आशा लागते. तेंव्हा पालकांनी आपल्या मुलांना या सवयीपासून दूर ठेवलेले
केंव्हाही चांगले.
धिर धरा, चिकाटी सोडू नका (Be patient, don't give up)
जेंव्हा आपण आपल्या मुलासाठी एखादा नवीन पौष्टिक पदार्थ तयार करता, तेंव्हा तो पदार्थ त्याने आवडीने खाल्ला नाही तर निराश होऊ नका. त्या पदार्थांची आवड निर्माण करण्यास आपण चिकाटी बाळगणे आवश्यक आहे. परंतु त्यासाठी धडपडणे आवश्यक नाही. त्यांच्यावर रागाऊ नका. तोच पदार्थ एखादा मुलगा अतिशय आवडीने खाईल, तर दुस-यास तो अजिबात आवडणार नाही. प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते. तो पदार्थ त्याला थोडा थोडा देऊन त्यांच्यामध्ये आवड निर्माण करा. सुरुवातीला कारले अजिबात न खाणारी मुलं नंतर अतिशय आवडीने खाऊ लागलेली उदाहरण आहेत.
मुलांसाठी आहाराचे पर्याय शोधा (Find dietary options for children)
आपल्या मुलाने जर भाज्या नाकारल्या तर आपण शाकाहारींमध्ये डोकावू शकता. जर तो दुध घेत नसेल आणि आपल्याला त्याच्या कॅल्शियमच्या सेवनाबद्दल काळजी वाटत असेल तर आपण दही हा पर्याय निवडू शकता. पालेभाज्या खात नसेल तर पौष्ठिक फळभाज्या ट्राय करा. वेगवेगळी कडधान्ये वारुन पहा त्याची आवड लक्षात घ्या.
लक्षात ठेवा आपण एकटे नाही आहात. आवश्यक असल्यास इतरांची मदत घ्या. नोंदणीकृत आहारतज्ञ, बालरोग विशेषज्ञ, बालरोगतज्ञ आणि आहार विशेषज्ञ यांचीही मदत घेऊ शकता.
(Back to main points)
लक्षात ठेवा आपण एकटे नाही आहात. आवश्यक असल्यास इतरांची मदत घ्या. नोंदणीकृत आहारतज्ञ, बालरोग विशेषज्ञ, बालरोगतज्ञ आणि आहार विशेषज्ञ यांचीही मदत घेऊ शकता.
(Back to main points)