Mobile/Cell Phone and Children’s Health
मोबाईल हे संप्रेषण, मनोरंजन आणि शिक्षणाचे प्रभावी साधन आहे. Mobile is an effective means of communication, entertainment,
and education.
अलिकडच्या काळात मोबाईल हा मानवाच्या जीवनाचा एक अविभाज्य
भाग बनला आहे. मोबाईल फोन आपल्या जीवनात एक महत्वाची भूमिका बजावत असला तरी त्याचे
तोटे देखील आहेत. आपल्या दैनंदिन जीवनात मोबाईलला संप्रेषणाचे सर्वात जलद साधन समजले
जाते. संपर्काच्या साधनाबरोबरच मोबाईलचा मनोरंजनासाठी उपयोग केला जातो. हल्ली अनेक
शैक्षणिक ॲप्स उपलब्ध असल्यामुळे मुलांना शिक्षणासाठी देखील त्याचा उपयोग होतो.
स्मरणात रहात नाही, केलेलाअभ्यास विसरता, मग ही माहिती एकदा वाचा...
ग्रामीण
भागातील अनेक पालकांनी हे अनुभवले आहे की, मुले शैक्षणिक ॲप्सचा शोध घेत इतरत्र भरकटले
जातात आणि आपला वेळ अभ्यासाव्यतिरिक्त ॲप्सचा शोध घेण्यामघ्ये घालवतात. पालकांनी जर
त्यांना मदत केली तर त्याचा योग्य उपयोग होऊ शकतो. परंतू पालकांकडे उपलब्ध असलेला वेळ
आणि माहिती याही गोष्टी महत्वाच्या आहेत.
मोबाईल
हे संप्रेषण, मनोरंजन आणि शिक्षणाचे प्रभावी साधन आहे. परंतू त्याचा योग्य पदधतीने,
योग्य कामासाठी उपयोग केला तर. हे झाले मोठया मुलांच्या बाबतीत, परंतू लहान मुलांचे
काय? त्यांना मोबाईलचे आकर्षण कसे निमार्ण होते?
सुरुवातीला वाटणारी गंमत नंतर सवयीमध्ये बदलते.
The
fun that initially feels then turns into a habit.
हल्ली
घरात जेवढी मानसे आहेत त्यापेक्षा जास्त मोबाईल हॅन्डसेट सापडतील. त्याचे कारण म्हणजे
एक मोबाईल खराब झाला की तो रिपेअर होईपर्यंत आपण मोबाईल शिवाय राहू शकत नाही. मोठ्या
मानसांचा मोबाईलचा अती वापर लहान मुले सतत पाहात असतात. लहान मुले अनुकरणप्रिय
असतात त्यामुळे त्यांनाही मोबाईलबद़ल आकर्षण निर्माण होत असते.
महाविद्यालयीन पाल्य,पालक व समाज
सुरुवातीला तुमच्या
नकळत मुले मोबाईल घेतात व मोठी मानसे कसे बोलतात? कसे हावभाव करतात? तसे
तेही करतात, त्यांच्याकडे पाहून मोठी मानसे हसतात, त्यांचे कौतुक करतात. तस मुलांनाही
आपण काहीतरी चांगल करत आहोत अस वाटत, मोबाईल बद्दल
त्यांना आकर्षण निर्माण व्हायला लागते. आणि मग आपल्याकडच मोबाईल असावा अस
त्यांना वाटत.
मुलांच्या
हातातील मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला तर ते रडतात, उडया मारतात, पळतात, काही तर जमीनीवर
लोळण देखील घेतात हे आपण पाहिलेले आहे. काही पालकांनी तर कौतुक म्हणून त्यांचे व्हिडिओ
देखील व्हायरल केलेले आहेत. अशा मुलांचे आधी कौतुकही होते परंतू तेही नकळत मोबाईलच्या
आहारी जात असतात हे आपण लक्षात घेत नाही.
मुले मोबाईलच्या आहारी जाण्यास जबाबदार कोण?
Who is responsible for children’s
mobile habits?
लहानमुले मोबाईलच्या आहारी जाण्यास माता, पिता आणि कुटुंबातील इतर सदस्य महत्वाची भूमिका बजावत असतात. काही माता मुलं जेवत नाहीत म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देतात, मग मोबाईल पाहता पाहता आई घास भरवते. मुलंही जेवत असतात पण त्या मुलांच लक्ष जेवणाकडे नसत, तर मुलं मोबाईलमध्ये रमलेले असतात, आईचे घास भरवण्याचे काम चालू असते, मुलेही खात असतात पण मोबाईलच्या नादात आपले पोट भरल्याचेही मुलांच्या लक्षात येत नाही. मुल छान जेवल्याचे समाधान आईच्या चेहऱ्यावर असते, पण नंतर त्याचे पोट दुखण्याचे कारण आपण फक्त शोधत राहतो. जेवताना मोबाईल पाहण्याचे रुपांतर सवयीमध्ये केंव्हा होते हे आपल्या लक्षातही येत नाही.
वडील
आणि कुटुंबातील इतर सदस्यांचा मोबाईलचा घरातील अतिवापर मुलं पहात असतात. विनाकरण मोठी
माणसेही मोबाईल सतत हाताळत असतात. कोणतिही टयून वाजली की लगेच मोबाईलकडे पाहातात. तेंव्हा
घरात जर लहान मुलं असतील तर कुटुंबातील सर्व सदस्यांनी मोबाईलच्या सर्व टोन कमी आवाजात
ठेवणे महत्वाचे आहे.
पूर्वी
आई वडील मार्केटमधून घरी आल्यानंतर मुलांची नजर त्यांच्या हातातील पीसवीकडे असायची,
उत्सुकता असायची की त्यांनी काय खाऊ आनला असेल याची. परंतू हल्ली आई वडील घरी आले की
मुलांची नजर बॅगकडे नसते तर मोबाईल ठेवलेल्या पर्सकडे असते. ते लगेच त्यांचेकडे मोबाईल
मागतात. यावरुन मुलांना कोणत्या गोष्टीचे आकर्षण जास्त आहे हे लक्षात येते.
मोबाईल/सेल फोन आणि मुलांचे आरोग्य
Mobile/Cell
Phone and Children's Health.
मोबाईल/सेलफोन किंवा स्मार्टफोनचा जास्त वापर वापरकर्त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे, परंतू मुलांच्या आरोग्यावर त्याचा जास्त परिणाम होतो. याबाबतचा इशारा डॉक्टरांनी वेळोवेळी दिलेला आहे. मोबाईलचा वापर मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगला नाही. सतत मोबाईल वापरल्याने मुलांच्या आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो? तर डोळे लाल होणे, त्यामुळे वेळोवेळी डॉक्टरांकडे जावे लागते. मोबाईलचा प्रखर प्रकाश अधीक वेळ डोळयासमोर राहिल्यामुळे चष्मा लागण्याची शक्यता वाढते. स्मरणशक्ती कमी होणे, हाताची बोटे दुखणे, मोबाईल रेडियशनचा शरीरावर परिणाम होणे, इत्यादी. [परीक्षेची भिती कारणे व उपाय]
मोबाईल हातात आसतांना कोणाचाही व्यत्यय नको म्हणून मुलं एकांत पसंत करतात त्यामुळे इतर मुलांमध्ये अशी मुले मिसळत नाहीत. इतर मुलांमध्ये न मिसळल्यामुळे ते एकलकोंडी होतात. स्वत:च्या जगात रममान होतात. असे आपण अनेक तज्ञ मंडळीकडून ऐकलेले आहे. बाहेर मैदाणावर खेळायला न गेल्यामुळे त्यांचा शारिरीक व्यायाम होत नाही. त्यामुळे रात्री झोपही चांगली लागत नाही. त्याचा परिणाम त्यांच्या शाळेतील ॲक्टिव्हिटीवर व अभ्यासावरही होतो. [अपयशातून यशाकडे]
इतर
मुलांमध्ये न मिसळल्यामुळे वैचारीक पातळी विकसीत होत नाही. मैदाणावरील खेळाचा आनंद
त्यांना घेता येत नाही. तसेच मैदाणावरील मोकळी हवा त्यांना मिळत नाही. अशा मुलांचे मित्रही कमी
असतात. जे थोडेफार असतात ते सर्व मोबाईल, मोबाईलवरील
गेम, मोबाईलवर काय केले? असे फक्त मोबाईल या
विषयावरच बोलत असतात.
मुलांना मोबाईलपासून
दूर ठेवण्यासाठी पालकांनी काय करावे?
What should parents do to keep
their children away from mobile?
मुलांना जर मोबाईलपासून दूर ठेवायचे असेल, तर अगोदर पालकांना आपल्या सवयीमध्ये काही बदल करावे लागतील. घरी असताना कारण नसताना मुलांच्या समोर मोबाईल हाताळत बसू नये. गरज नसतांनाही त्याचा एका विशिष्ट मर्यादेपलीकडे वापर करणे टाळावे. घरात सारखे सारखे मोबाईल या विषयावर बोलू नये. [आहार आणि मुलांचे आरोग्य]
आपआपल्या कामामुळे घरातील सर्व मंडळी दुपारचे जेवण एकत्र घेऊ शकत नाहीत, परंतू रात्रीचे जेवण मात्र एकत्र घ्यायला काय हरकत आहे? त्यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांशी मोकळेपणाने गप्पा मारतील. दिवसभरातील प्रसंग एकमेकांना सांगतील. घरातील वातावरण आनंदी होईल. मोबाईलच्या अडथळयाविना घेतलेल्या जेवनाचा आनंद काही वेगळाच असेल. जर कौटुंबीक वातावरण आनंदी, उत्साही राहात असेल, मुलंही मोबाईलपासून दूर रहात असतील तर घरी मोबाईल थोडा बाजूला ठेवायला काय हरकत आहे? [मुलांसंबंधी संकल्पना]
आपला जास्तीतजास्त वेळ मुलांसाठी द्या
Give children
as much time as possible.
पालकांनी घरी असताना आपला जास्तीत जास्त वेळ मुलांसाठी दिला पाहिजे. नोकरी, धंदा किवा इतर कामामुळे पालक, त्यात आई-वडील दोघेही घराबाहेर पडत असतील तर, अशा पालकांचा आपल्या मुलांबरोबरचा सहवास कमी असतो. दररोज नोकरी किंवा धंदयाच्या निमित्ताने घराबाहेर पडना-या आई वडिलांची घरी येण्याची आतुरतेने दरवाज्यात, गेटजवळ आणि गॅलरीत उभे राहून वाट पाहात असलेली मुलं आपण पाहिलेली आहेत. [स्वत:च्या अभ्यासाची सर्वोत्तम पद्धती]
वडील
घरी आले की, वडिलांकडे पळत जाऊन त्यांच्या हातातील मोबाईल घेणारीही मुलं आहेत. म्हणजे
अशी मुलं आपली घरी येण्याची आतुरतेने वाट पाहतात, ती आपली नाही, तर आपल्या मोबाईलची.
तेंव्हा पालकांनी ठरवाचय आपल्याला आपली वाट पाहणारी मुलं हवी आहेत की आपल्या मोबाईलसाठी
वाट पाहणारी.
मुलांना
इतर ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतवा
Engage
children in other activities.
घरी
असताना पालकांनी आपला जास्तीतजास्त वेळ मुलांसाठी देणे महत्त्वाच आहे. घरी असताना
मुलांना चित्रकला, रंगकाम, हस्तकला, संगीत, नृत्य, वादन, इनडोअर व आऊटडोअर गेम्स, पझल,
हस्ताक्षर, वाचन इत्यादी. गोष्टी शिकविल्या तर मुले त्यात रमतील.
त्यातून त्यांची आवड-निवडही लक्षात येईल. प्रेमाणे एकमेकांशी गप्पा मारा त्यामुळे
विचारांची देवाणघेवाण होईल. लहान मुलांना विश्वासात घेतले आणि एखादी गोष्ट त्यांना
पटवून दिली की ते लगेच समजतात.
मोबाइल फोनशी संबंधीत पालकांचे प्रश्न
Parents'
questions related to mobile phones.
पालकांचे मोबाईल आणि स्मार्टफोन विषयी खालील प्रश्न विचारतात
सेल्युलर रेडिएशन मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे का? ब-याच तज्ञांनी स्पष्ट केले की फोनमुळे होणारे रेडिएशन मुलांच्या आरोग्यासाठी साठी घातक आहे मुलांच्या आरोग्यावर त्याचे बरेच दुष्परिणाम होतात. सेल फोनच्या रेडिएशनमुळे मुलांच्या वागणुकीवर परिणाम होऊ शकतो. फोनचा अति वापर मुलांच्यादृष्टीने त्रासदायक आहे. फोनच्या रेडिएशनचा मुलांच्या मेंदूवर वाईट परिणाम होतात. मोबाईलचा अति वापर मान खाली घालून केला जातो तेंव्हा त्याचा परिणाम मानेवर व मणक्यांवर होतो. [पालकांनो…!!! मुलांच्या भावना समजून घ्या]
मोबाइल मुलांसाठी चांगला आहे का? डॉक्टर कमी वयाच्या म्हणजे 15 ते 16 वय वर्ष असणा-याना प्रामुख्याने मोबाईल देणे टाळले पाहिजे. मोबाइल फोनसाठी कोणते वय योग्य आहे? प्रथम पालकांना हे समजले पाहिजे की आपल्या मुलांना मोबाइल देणे टाळले पाहिजे. हे त्यांच्या पालकांच्या मोबाइलच्या वापरावर अवलंबून आहे. योग्य कारणांसाठी विशिष्ठ वेळेपुरता मोबाईल वापरण्यास दिल्यानंतर पुन्हा मोबाईल घेतांना त्यांची मानसिकता बदलते.तेंव्हा त्यांना मोबाईल देतानाच विश्वासात घेणे महत्वाचे आहे. [मुलांसाठी चांगल्या सवयी/Good Habits for Children]
पालक
आपल्या मुलांचे मोबाईल व्यसन कसे रोखू शकतात? या विषयीची माहिती वर दिलेली आहे. पालकांनी
त्यांचा मोबाईलचा वापर मर्यादित केला पाहिजे. पालक घरी असतात तेव्हा मोबाईल दूर ठेवा.अभ्यासाच्या वेळी मोबाईलमुळे आपल्या मुलांच्या एकाग्रतेत अडथळा येत असेल
तर मोबाईल बंद करुन ठेवा. पालकांनी मोबाइलच्या काही नोटिफिकेशन्स बेद केल्या
पाहिजेत. जर मुलांना एकदा मोबाईलच्या वापराचे व्यसन लागले तर मोबाईलच्या व्यसनातून
मुक्त करणे खूप कठीण आहे.
सवयीचेमूळ
घट्ट होण्यापूर्विच नष्ट करा.
Destroy the
plant of habit before it becomes a tree.
लहान
वयात लागलेल्या सवयीच मूळ जर घट्ट रुतल तर झाड उखडल्याशिवाय ते नष्ट होत
नाही. तेंव्हा कुठलिही सवय आपले मूळ पक्के करण्यापूर्विच नष्ट करणे महत्वाचे आहे. मोबाईलच्या
अती आहारी गेलेल्या अनेक मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना आपण पाहिलेल्या आहेत. तेंव्हा
मुलांकडे लक्ष ठेवा, त्यांच्या सवयी शोधा, त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधा, त्यांना
एकलकोंडे होण्यापासून वाचवा, त्यांच्यासाठी घरात जास्तीतजास्त वेळ द्या.
एकंदरीत मोबाईल फोनशी संबंधीत काही बदल जर आपण केले तर त्याचा तोटा नक्कीच होणार नाही, मात्र झाला तर फायदाच होईल. मोबाईल फोनमुळे आपली सर्वांची सोय झाली आहे, मोबाईलमुळे जगातील माणसे जवळ आली आहेत यात दुमत नाही, पण या सोयीच व्यसनात रुपांतर होणार नाही याची काळजी घेणही तितकच महत्वाच आणि गरजेच आहे.
आपला अभिप्राय किंवा सूचना जरुर कळवा, आपल्या प्रतिसादामुळे नवनवीन लेख लिहिण्याची ऊर्जा मिळते.