यशाचा मार्ग (The way to success)


Key Points

आपण जीवनात किंवा व्यवसायात अयशस्वी होता, तेव्हा आपण काय करु शकता या विषयीची माहिती देणारा हा लेख आहे. 

अपयशातून यशाकडे जाण्यासाठी किंवा आपण अयशस्वी होता तेंव्हा पुन्हा यशस्वी होण्यासाठी खालील गोष्टींचा विचार करता आला तर पाहा.


आपली चूक मान्य करा

आपल्या चूकिमुळे जर अपयश आलेले असेल तर ते मान्य करा. मी कधीच चूकत नाही असे म्हणून आलेल्या अपयशाचे खापर इतरांवरती फोडू नका. आपल्याला अपयश मान्य नसेल तर यश कधीच मिळणार नाही.

आपली चूक मान्य केली तर, तुम्हाला नवीन प्रकल्प सुरु करण्यास किंवा नवीन कल्पनांचा प्रयोग करण्यास कधीही थांबविले जाणार नाही. यशस्वी होणे किंवा अपयश येणे हे जीवनात कधीही न थांबणारी घटना समजून ती स्विकारली पाहिजे. मानव असण्याचे एक उत्तम कोट म्हणजे, “मानव असणे म्हणजे अपयशी होणे.” अनेकांना वैयक्तिक अनुभवारुन हे सत्य आहे हे माहित आहे. नेहमीच मोठया यशाची अपेक्षा करणारे आपल्या छोटया चुका मान्य करतात.

(Back to the key points)


अपयश लपवू नका

प्रत्येकजन प्रत्येक काम हे यशस्वी होण्याच्या हेतूनेच करत असतो. परंतू काही कारणास्तव अपयश आले तर ते तुमच्या वैयक्तिक अकार्यक्षमतेचे लक्षण नाही. हा फक्त एक प्रयोग चुकीचा झाला आहे. आपण प्रयत्न करत राहणे हेच महत्त्वाचे आहे. अपयशातूनच यशाचा मार्ग सापडतो.

कशाचीतरी सुरुवात करणे आणि अयशस्वी होणे यापेक्षा सर्वात वाईट गोष्ट म्हणजे कशाचीतरी सुरुवात न करणे ही आहे. म्हणजे काहीही न करण्यापेक्षा, काहीतरी करत राहणे हे महत्वाचे आहे. आपल्या चुका आपले निमित्त नसून आपली प्रेरणा असावी. आपण किती चुका केल्या किंवा आपण किती सावकाश प्रगती केली हे महत्त्वाचे नाही. तर अपयशानंतरही आपण प्रयत्न करत आहात म्हणजे आपण इतरांपेक्षा पुढे आहात.

स्वत:ला दोषी समजून आलेले अपयश लपवू नका. ते सामायिक केल्यास अनेकांची मदत होऊ शकते. इतरांचे अनुभव आणि सल्ला उपयोगी पडू शकतो. एका सुज्ञ माणसाने म्हटले आहे “जर आपल्याकडे अपयश ठेवण्यासाठी जागा नसेल, तर आपल्याकडे यश वाढण्यास जागा नाही.”

(Back to the key points)


मानसिक लवचिकता ठेवा

आपण नोकरी किंवा व्यवसायामध्ये काटेकोरपणे सर्व नियम पाळून अगदी कडकपणे एखादी योजना राबवण्याचा किंवा ध्येय गाठण्याचा प्रयत्न करीत असता. आपण तंतोतंत सर्व नियम पाळूनही काही गोष्टी योजनेनुसार होत नाहीत, तेव्हा आपण निराश होता. अशा वेळी जर तुम्ही तुमच्या मनासारखे होत नाही असे समजून सहका-यांना सुनावले तर काही गोष्टी रुळावरुन घसरु शकतात.

परंतू जर आपल्याकडे अधिक लवचिक मानसिकता असेल आणि इतरांना सामावून घेऊन काम करण्याची क्षमता असेल तर सर्वांचे सहकार्य मिळते. विचार करा, तुम्ही  कदाचित योजनेनुसार जाऊ शकता परुतू इतरांना बरोबर घेऊन जाताना सर्वांकडून ती अपेक्षा करु नका, ठीक आहे असा विचार करुन त्यांच्यात बदल घडविण्याचा प्रयत्न करा, कारण गोष्टी बदलतात. सर्वच ठिकाणी नियम आणि अधिकाराचा वापर करुन चालत नाही, तर मानसिक लवचिकताही ठेवावी लागते.

(Back to the key points)


प्रत्येक प्रयत्न हा शिकण्यासाठी असतो

जेव्हा आपण अपयशी ठरतो, तेंव्हा आपण निराष होतो. आपण केलेले प्रयत्न वाया गेले असे समजतो. खरे तर आपण अयशस्वी होण्यापूर्वी, काहीतरी चांगले करण्याचा विचार केलेला असतो. अपयशानंतर आपले प्रयत्न व वेळ वाया गेला असे आपण समजतो. परंतू तसे समजण्याचे कारण नाही. कारण, जर आपल्याला आपण अयशस्वी होणार आहोत हे अगोदर माहित असते तर, आपण ते काम स्विकारलेच नसते, प्रयत्न केलेच नसते, आणि  आपल्याला त्या कामाचा अनुभव आला नसता. आपल्या प्रयत्नातून काहीच मिळाले नाही असे समजू नका तर मिळालेला अनुभव हे यश आहे असे समजून पुन्हा प्रयत्न करण्यासाठी सज्ज व्हा.

आलेल्या अनुभवाच्या आधारे आपण आपली योजना समायोजित करु शकता, अपयशाची कारणे शोधून त्यावर मात करुन काहीतरी नवीन शोधू शकता, एक नवीन पद्धत वापरुन पुन्हा यश मिळवू शकता. कारण माणूस हा शेवटपर्यंत शिकत असतो. तेंव्हा शिकत रहा.

(Back to the key points)


कठीण प्रसंगी इतरांची मदत घ्या

मी सर्वकाही करु शकतो, मी स्वयंपूर्ण आहे ही भावना असणे चांगले आहे, परंतू मी परीपूर्ण आहे, मला कोणाच्याही मदतीची गरज नाही असे म्हणून चालत नाही. इतरांना दुर्लक्षित करुन चालत नाही. कारण कोणतिही व्यक्ती जीवनात यशस्वीपणे एकट्याने प्रवास करीत नाही. जीवनात यशस्वी होण्यासाठी मी पणाची भावना बाजूला ठेवावी लागते.

जेव्हा आपल्यामध्ये असलेली आशा किंवा क्षमता क्षीण होऊ लागते, तेव्हा आपण इतरांकडे पाहतो. आपण एखाद्या कठीण गोष्टीशी झगडत असतो तेव्हा आपल्याला माहित असते की आपण एकतर हार मानू शकतो किंवा एक चांगला मार्ग शोधू शकतो. परंतु एक चांगला मार्ग शोधणे नेहमीच सोपे नसते. अशावेळी आपण आपल्या विश्वासू मित्रांची मदत घेऊ शकता. कारण आपल्याला माहित आहे की, “गरजेच्या वेळी जो मदत करतो, तोच खरा मित्र असतो.” आपण कठीण प्रसंगी आपले मित्र किंवा इतरांची मदत घेण्यात कमीपणा नाही, तर तो मोठेपणा समजावा.

(Back to the key points)


स्वप्न पाहा आणि पूर्ण करा

स्वप्न जशी पाहता येतात, तशीच पूर्तता झाली तर, हे ही स्वप्नासारखेच असेल. दुर्दैवाने तसे होत नाही. त्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी पूर्ण करणे गरजेचे आहे. याचा अर्थ सराव करणे, चूका होणे, चूका शोधणे, त्यातून शिकणे आणि पुढे जाणे.

आपण आपल्या आयुष्यापासून सतत निराश होत असतो. आपण आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा आणि यशस्वी जीवन जगू इच्छितो, परंतु आपण ते करत असल्याचे दिसत नाही. आपल्या आजूबाजूला प्रत्येकजण त्यांच्या जीवनात समाधानी आहे. त्यांनी आपली स्वप्ने साध्य केली आहेत. जे लोक संकटात सापडले आहेत तेसुद्धा आपली स्वप्ने जगताना दिसत आहेत. मग माझ्या बाबतीत असे का?

यावरुन बालपणातील एका कवितेची ओळ आठवते “गणपत वाणी विडी पितांना चावायचा नुसतीच काडी, आणि म्हणायचा या जागेवर बांधीन माडी” हा गणपत वाणी कोण? तर गावातील स्वप्न पाहणारा एक नंबरचा आळशी माणूस. गावातील एका झाडाच्या पारावर बसून समोर असलेल्या मोठया मैदानाकडे पाहून स्वप्न पहात असे. तेंव्हा आपला गणपत वाणी होऊ नये हीच अपेक्षा.

आपण पाहिलेले स्वप्न पूर्ण करत असताना अपयश आल्यास आपले प्रयत्न थांबवू नये. आपल्या अपयशातून आपण स्वप्न पूर्तीच्या दिशेन एक पाऊल पुढेच टाकत आहोत. स्वप्नांचा पाठलाग करण्यास अधिक सुसज्ज होत आहोत. अयशस्वी होण्यामुळे न खचता काहीतरी नवीन करुन दाखविण्याची आणखी एक संधी आपल्याला मिळते. हे आपल्याला नवीन काहीतरी करण्यासाठी अधिक अनुभवयुक्त, मजबूत आणि उत्कृष्ट बनवते. अपयश अवांछनीय आहे. होय, जेव्हा आपण ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अयशस्वी होण्याची आपण कधीही अपेक्षा करत नाही.  

(Back to the key points)


आपले धेय्य नेहमी स्मरणात ठेवा

आपले लक्ष्य उच्च असावे, धेय्य पूर्तीसाठी प्रारंभ योग्य वेळी करा. आपले प्रयत्न चालू ठेवा. आपली उद्दिष्टे आपण ठरवा, इतरांना आपल्यासाठी उद्दिष्टे ठरवू देऊ नका. यश कसे दिसते हे अनुभवा. हे ध्येय महत्त्वाचे का आहे ते समजून घ्या. आपल्या कामगिरीचा मागोवा घ्या. आपल्याला हे समजले पाहिजे की आपण धेय्य परिपूर्णतेपासून दूर आहात की जवळ आहात. आपले ध्येय प्रगती असले पाहिजे, परिपूर्णतेचे नाही.

एखाद्या गोष्टीचा त्याग करणे सोपे असते, कारण त्यासाठी विशेष काही करावे लागत नाही. परंतू हार मानणे म्हणजे आपण महत्त्वाचे काहीतरी हरवत आहोत. आपण एखाद्याला मदत केल्याचे जसे कायम लक्षात ठेवतो तसे, आपले धेय्य स्मरणात ठेवणे महत्वाचे आहे.

धेय्य स्मरणात असेल तर, धेय्य पूर्तीसाठी नव्याने प्रयत्न करण्याची उर्जा मिळते. आपणास पुढे नेण्यासाठी धेय्य पुरेसे आहे.

(Back to the key points)


गरजेनुसार विश्रांती घ्या

धेय्य प्राप्तीसाठी आपण झगडत असल्यास, कधीकधी मनाला किंवा शरीराला विश्रांतीची गरज लागते. म्हणून आपण गरजेनुसार विश्रांती घेणे महत्वाचे आहे. प्रत्येक परिस्थितीसाठी योग्य अशी कोणतीही वेळ निश्चित केलेली असली तरी त्यामध्ये लवचिकता असावी.

काही गोष्टींसाठी, आपण काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करण्यापासून काही आठवडे उरले आहेत. त्यासाठी लागणारी सामग्री पूर्ण करण्यात आपण सतत अयशस्वी होत असल्यास, ते पूर्ण करण्याचा एक नवीन मार्ग शोधा. प्रक्रिया, नित्यक्रम किंवा दृष्टिकोन बदला.

काहीतरी करण्याचा चांगला मार्ग नेहमीच असतो. आपण कदाचित कामापासून लांब जाऊन विश्रांती घेऊ शकणार नाही परंतु मुख्य म्हणजे स्वत: ला विश्रांती द्या आणि त्याकडे नवीन मानसिकतेसह परत जा. नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीला पर्याय असतात.

इच्छित धेय्य गाठता आले नाही तर, जीवनातील एखाद्या क्षणी आपण निराश व्हाल. परंतू त्यातूनच आपण शिकत त्याच ध्येयाकडे जाणारा वेगळा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला तर यश मिळते. आपण जर हार मानली तर त्यासारखा दुसरा त्रास नाही.

आपण कोण आहात किंवा आपण कोठून आला आहात यामुळे आपण यशस्वी होऊ शकत नाही. असा विचार करुन आपण फक्त वेळ निभावतो.

(Back to the key points)


चुकांबद्दल पश्चाताप करत बसू नका

जेव्हा आपण चुकतो, तेंव्हा चुकांवर पश्चाताप करत बसू नका, तर त्या चूका पुन्हा होणार नाहीत यावर विचार करा. घडलेली घटना घडून गेलेली असते, नंतर त्यावर पश्चाताप करण्यात काहिच अर्थ नसतो. उलट मानसिकता अधिक बिघडते. घडून गेलेल्या घटनेबद्दल पश्चातापाशिवाय काही करण्यासारखे आपल्या हातात नसते, मात्र तीच घटना पुन्हा घडू द्यायची नाही हे आपल्या हातात असते. तेंव्हा त्यासाठी प्रयत्न करा.

जे लोक मणाने सक्षम असतात, ते पुन्हा नव्याने प्रारंभ करतात. चुकांमधून नवीन काहीतरी शिकतात. होऊन गेलेल्या घटनेला महत्व न देता, त्या प्रकारची घटना पुन्हा घडणार नाही याला जास्त महत्त्व देतात. त्यासाठी प्रयत्न करतात आणि यशस्वी होतात.

(Back to the key points)


यश मिळवायचे असेल तर, अपयश अपरिहार्य आहे

एक गोष्ट निश्चितपणे निश्चित आहे, जर तुम्हाला खरोखरच आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, एखादी खास गोष्ट करायची असेल, काहीतरी अविश्वसनीय करुन दाखवायचे असेल, यशाचे शिखर गाठायचे असेल, नावलौकिक मिळवायचा असेल, आणि आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील तर हे सर्व करत असताना अपयश अपरिहार्य आहे. तेंव्हा अपयशाने खचून न जाता धैर्याने सामोरे जाण्याशिवाय दूसरा पर्याय नाही.

ज्याला जीवनात यशस्वी व्हायचय तो अपयश बाजूला ठेवून यशाचे शिखर कितीही उंच, कठीण किंवा खडतर असेल तरी, न घाबरता, न डगमगता पुढे जातो, त्याला यशाचे किरण दिसल्याशिवाय राहात नाही. संकटे येत राहतात, त्यावर मात करुन जो पुढे जातो तोच जिवनात यशस्वी होतो.

(Back to the key points)

आमचे मुलांविषयीचे खालील लेख वाचायला देखील आपणास आवडतील.